Maharashtra News Updates 8th March 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

आजपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विधिमंडळ आजही विरोधक शेतमालाला हमी भाव आणि इतर मुद्यांवर आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आठवडा वादळी ठरण्याची चिन्ह आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात गुजरातपासून होणार आहे. तर, जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. 

मुंबईत आज घडणाऱ्या इतर महत्त्वाच्या घडामोडी

– कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आज मुंबईत महाविकास आघाडीमधील नेत्यांची भेट घेणार आहे. 

– मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या एमसीए महिला लीगचं सकाळी 8.45 वाजता उद्घाटन होणार आहे.

– राज्य महिला आयोगाच्यावतीनं आयोजित महिला दिनानिमीत्त जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमदिर वांद्रे येथे होणार आहे.

– अँटिलिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सुनील मानेचा माफीचा साक्षीदार होण्याकरता विनंती केली आहे. सुनील मानेच्या अर्जावर आज तपास यंत्रणा आपलं उत्तर कोर्टात दाखल करण्याची शक्यता आहे. 

– कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. तपास यंत्रणेकडून चालढकल सुरू असल्याचा पानसरे कुटुंबियांचा हायकोर्टात आरोप करण्यात आला आहे.

बेशिस्त वाहन चालकांमुळे लातूरमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, दोघांवर गुन्हा दाखल

लातूर शहरातील बाह्यवळण रस्त्याहून चाकूरकडे निघालेल्या टाटा सुमो गाडीने सारोळा चौकात समोरून आलेल्या एका दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याची घटना घडली. त्यामध्ये दुचाकीस्वार सूमोमध्ये अडकला, तरीही न थांबता चालकाने वाहन भरधाव चालवले. यामध्ये दुचाकीस्वार काही अंतरावर फरपटत गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. नयूम खाजामिया शेख टकारी (वय 40) असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. 

भाजपने पंकजा मुंडेसह अनेक नेत्यांना वापरुन बाजूला केलं, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

भाजपने पंकजा मुंडे यांनाच नाही तर अनेकांना वापरून घेतलं. यात लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सदाभाऊ खोत, राजु शेट्टी, महादेव जानकर आदी नेत्यांना भाजप पक्षाने वापरून घेत बाजूला केल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज अहमदनगर दौऱ्यावर होत्या, यावेळी त्या बोलत होत्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *