Maharashtra Politics : मोठी बातमी : शरद पवार आमच्यासोबत येणार, लवकरच फटाका फुटणार, प्रवीण दरेकर यांचा दावा

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्रातला कधीही आवाज न करणारा फटका आहे आणि तो फटका लवकच फुटणार असल्याचा दावा भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलाय. तसेच ‘शरद पवार हे लवकरच महाराष्ट्राच्या विकासात आम्हाला साथ देतील; असा गौप्यस्फोटही प्रवीण दरेकरांनी केलाय. अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर प्रवीण दरेकरांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानलं जात आहे. ‘एबीपी माझा’शी (Abp Majha) संवाद साधताना प्रवीण दरेकरांना हा मोठा गौप्यस्फोट केला. प्रवीण दरेकरांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलय. 

राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रतापराव पवारांच्या घरी अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली. त्यानंतर अजित पवार हे थेट दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. त्यातच आता प्रवीण दरेकरांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

‘अजित पवार काय फटाके फोडतायत लवकरच कळेल’

अजित पवार हे अॅटम्ब बॉम्ब आहेत. ते दिल्लीत जाऊन काय फटाके फोडतायत ते लवकरच कळेल असा दावा देखील प्रवीण दरेकर केलाय. दोन बॉम्बस्फोटानंतर काहीही फुटलं तरी ते आमच्या पथ्यावर पडणार आहे, असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. 

 देवेंद्र फडणवीसांचा फटाकाही सायलेंट – दरेकर

शरद पवारांसारखाच देवेंद्र फडणवीस यांचा देखील फटाका सायलेंट आहे. त्यांना फटाके फोडायला आवडतात. प्रवीण दरेकर यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी देखील भाष्य केलं आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सरकारमधली बंदुक आहेत, गोळ्या नाहीत तिच्यात पण ते गोळ्या काढुन खिशात ठेवतात. योग्य वेळ आली त्या गोळ्या ते बाहेर काढतात. 

दरम्यान प्रवीण दरेकरांच्या या मोठ्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा राज्यात राजकारणात कोणता नवा भूकंप होणार  हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. त्यातच काही दिवसांपूर्वी झालेली शरद पवार आणि अजित पवारांची भेट, त्यानंतर अजित पवारांची दिल्ली वारी ही या भूंकपाची नांदी तर नाही ना हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जातोय. त्यामुळे प्रवीण दरेकरांनी केलेल्या या वक्तव्यावर शरद पवार काही प्रतिक्रिया देणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

[embedded content]

हेही वाचा :

Sanjay Gaikwad : ‘तर मी बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढवणार’, शिंदे गटाच्या आमदाराचे भाजपला खुलं आव्हान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *