Maharashtra Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटच्या आठवडा, अवकाळीवरुन सरकारला विरोधक घेरणार?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटच्या आठवडा सुरु होतोय. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागणीवर आज सभागृहात चर्चा होईल.. तसंच राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय… . मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62 हजार 480 हेक्टर वरील पिकांचं अवकाळीमुळे नुकसान झालंय तर आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय तर 36 जण जखमी झालेत. तर आत्तापर्यंत 76 जनावरं देखील या अवकाळी पावसामुळे दगावलीत.)) दरम्यान लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होतेय.. याच मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ होण्याची शक्यता आहे.