Maharashtra Temples : देवा तुला भेटू कसं?महाराष्ट्रातल्या मंदिरांसाठी एकच नियमावली का नाही?ABP Majha

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने घटस्थापनेपासून धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या संदर्भात राज्य सरकारने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार आता राज्यातील अनेक ठिकाणच्या मंदिर प्रशासनांनी तयारी सुरु केली आहे. नवरात्री उत्सवात तर मंदिरांमध्ये अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत गरबा आणि दांडिया खेळण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तर मुंबईबाहेर नियमांचे पालन करुन हे खेळ खेळावेत असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.