Maharashtra Uday Samant : अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस,उद्योगांवरील श्वेतपत्रिकेचा अद्याप पत्ता नाही

वेदांता फॉस्कोननंतर महाराष्ट्रातील उदयोग परराज्यात जात असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात होते दरम्यान एका महिन्यात श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नोव्हेंबर महिन्यात केली होती.. मात्र महिनाभरात श्वतेपत्रिका निघाली नाही त्यानंतर हिवाळी अधिवेशनात  तत्काळ श्वेतपत्रिका काढू असं आश्वासन देण्यात आलं मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आलं तरी श्वेतपत्रिका काढण्यात आली नाही. राज्यात वेदांता फॉक्स्काँन, एअरबस आणि बल्क ड्रग पार्क  प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्यामुळे शिंदे फडणवीस सरकारवर महाविकास आघाडी सरकारने जोरदार टीका केली होती. त्यानंतर हे उद्योग आमच्या काळात राज्यबाहेर गेले नाहीत  श्वेतपत्रिका काढून सत्य जनतेसमोर आणू असं स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं होतं दरम्यान याच मुद्द्यावरुन विरोधक अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *