Mahim Koliwada : कोरोनाचे नियम धाब्यावर लावत माहीम कोळीवाड्यात रस्त्यावर बिनधास्त डान्स पार्टी

Holi 2021 : होळीचा उत्सव हा कोळी समुदायासाठी एक मोठा सण. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातल्या कोळी बांधवांनी आज आपल्या होड्या पताका लावून तर काहींनी फुलांच्या माळा लावून सजवल्या होत्या. प्रत्येक होडीवर गाण्यांच्या तालावर कोळी बांधवांनी नाचत होळीच्या सणाचा आनंद लुटला.
होळीचा उत्सव हा कोकणी बांधवांचा मोठा सण, तर समुद्रकिनारी राहणारे आगरी- कोळी बांधव देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव हे होळीचा हा सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करतात. हेच चित्र राज्यातील इतरही कोळीवाड्यांमध्ये पाहायला मिळतं.