Nana Patole | विधानसभाध्यक्ष पटोलेंकडून फडणवीसांच्या काळातील जमीन वितरणाच्या चौकशीचे आदेश

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस सरकार काळातील काही जमीन आवंटनाबाबत गृह खात्याला आज चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची तक्रार अॅड.सतीश उके यांनी पटोलेंना केल्याचं कळलं आहे. जमिनी ज्या संस्थांना व्यक्तिगत संबंधांमुळे दिल्याचे आरोप सतीश उके यांनी केले आहेत त्या संस्थांचा संबंध हा तामिळनाडूचे राज्यपाल बनवरीलाल पुरोहित यांच्याशी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याची केस ज्यांविरोधात केली तेच हे तक्रारकर्ते सतीश उके आहेत. नुकतीच अश्या प्रकारची तक्रार उके यांनी भाजप नेते प्रवीण दटके यांच्या विधान परिषद निवडणुकीच्या वेळीही केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.