Nashik : Kirit Somaiya यांच्याकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहाणी, चर्चांना उधाण

भाजप नेते किरीट सोमय्या नाशिक दौऱ्यावर असून ते पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहाणी करण्यासाठी गेले होते. किरीट सोमय्या यांनी आर्म स्ट्रॉग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली ला भेट दिली. मागील आठवड्यात सोमय्या यांनी भुजबळ यांच्या मालमत्तेवर प्राप्तीकर विभागाने कारवाई केल्याचा दावा केला होता. त्यावर भुजबळ यांनी कोणतीच करावाई झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिले होते. महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होताच किरीट सोमय्या यांच्या रडारवर पुन्हा छगन भुजबळ आल्याचं दिसत आहे. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

Leave a Reply

Your email address will not be published.