NIA Raids : स्वातंत्र्य दिनापूर्वी NIA मोठी कारवाई; PFI शी संबंधित अनेक ठिकाणांवर छापा

मुंबई लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करून शांतता बिघडवण्याचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (PFI) कट हाणून पाडण्यासाठीच्या सतत प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी पाच राज्यांमध्ये छापे टाकले. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यात एनआयए ही कारवाई केली. या पाच राज्यातील 14 ठिकाणी छापे टाकून काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

एनआयएने केरळमधील कन्नूर आणि मलप्पुरम, कर्नाटकातील दक्षिण कन्नड, महाराष्ट्रातील नाशिक आणि कोल्हापूर, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि बिहारमधील कटिहार येथे छापे टाकले. या वेळी एनआयएने डिजीटल उपकरणे, कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. 

दहशतवादी, हिंसाचार आणि तोडफोडीच्या कृत्यांमधून 2047 पर्यंत भारतात इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी पीएफआय प्रयत्नशील असल्याचा आरोप आहे. त्यासाठी PFI कडून कट्टरतावादी विचारांचा प्रसार करण्यासह सशस्त्र प्रशिक्षित तरुणांची संघटना उभी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानंतर गृहमंत्रालयाने पीएफआयवर बंदी घातली. तर, दुसरीकडे एनआयएने आपली कारवाई सुरू ठेवली आहे. 

NIA ला संशय आहे की PFI चे हस्तक ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून काम करत आहेत. देशाच्या विविध राज्यांमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहेत. कट्टरतावादी PFI केडर्सना शस्त्रे, लोखंडी रॉड, तलवारी आणि चाकू वापरण्याचे प्रशिक्षण देत आहेत.  गुप्तचर आणि तपासात्मक विश्लेषण आणि अंतर्दृष्टीच्या आधारावर, या कॅडर आणि कार्यकर्त्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून विविध राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

हा कट उधळून लावण्यासाठी एनआयए छापे टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. गुप्त माहितीच्या आधारे तपास यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यकर्त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकत आहे.

पीएफआयवर बंदी 

NIA ने एप्रिल 2022 मध्ये दिल्लीत PFI विरोधात गुन्हा दाखल केला होता. गेल्या वर्षी केंद्र सरकारने पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. त्यादरम्यान अनेक पीएफआय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते.

मार्च 2023 मध्ये त्यापैकी 19 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात एक संघटना म्हणून पीएफआयचेही नाव होते.  त्यानंतर, एप्रिल 2023 मध्ये, शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणाऱ्या PFI च्या राष्ट्रीय समन्वयकाविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *