Pandharpur | पंढरपुरातील कुंभार घाटाची भिंत कोसळली, आडोशाला उभ्या असलेल्या 6 जणांचा मृत्यू

पंढरपूर शहरात गेल्या 15 तासांपासून अखंड पावसाचा धुमाकूळ सुरू असताना आज दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भींत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रभर मुसळधार पावसाने कुंभार घाटावरील नवीन घाटाचे बांधकाम कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल व आपत्कालीन यंत्रणेने हे सर्व सहा मृतदेह दगड ढिगाऱ्याखालून बाजूला काढले आहेत. ठेकेदारावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका तेथील कोळी समाजाने घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *