Pune PFI News: पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी; PFI च्या कार्यकर्त्यांचा धक्कादायक व्हिडीओ

Pune PFI News: पुण्यात बेकायदेशीर झालेल्या पीएफआयच्या (PFI) आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या या घोषणा दिलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली होती. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीरपणे आंदोलन केलं. या आंदोलनात अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आहेत. 

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यलयासमोर काल तीन वाजताच्या सुमारास पीएफआयतर्फे पदाधिकाऱ्यांना अटक केल्यामुळे निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी जमावाने मोठ्याने घोषणाबाजी केली. सुरुवातीला आंदोलनात फार कार्यकर्ते सहभागी झाले नव्हते मात्र आंदोलनाला आलेल्या कार्यकर्त्यांनी अनेकांना फोन करुन बोलावून घेतलं. मात्र हे आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात गेतलं. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आलं. यावेळी अनेकांना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलं.

आंदोलनाला पोलिसांनी नाकारली होती परवानगी
कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पीएफआयच्या कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. जक्या चार लोकांसोबत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या, अशा सूचना पोलिसांनी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या. मात्र जमावाने या सूचनांचं पालन न करता मोठ्याने घोषणाबाजीला सुरुवात केली. खाली बसून मोठमोठ्याने घोषणाबाजी केली त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्नदेखील केला. जमावाकडून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी लगेच कारवाई करायला सुरुवात केली होती. 

60-70 पीएफआय कार्यकत्यांविरोधात गुन्हा दाखल
अब्दुल कयूम शेख आणि रझी अहमद खान दोघांना दहशतवादी कृत्यांसाठी पैसे पुरवल्याच्या संशयावरुन राज्य दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या अटकेविरोधात पुण्यातील पीएमआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. परवानगी नसताना केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी 60-70 पीएफआय कार्यकत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बंड गार्डन पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कार्यकर्त्यांनी अडवला होता रस्ता
या आंदोलनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता अडवला होता. जमावामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. अचानक जमलेल्या या सगळा कार्यकर्त्यांमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली होती.  

महत्वाच्या बातम्या…

NIA-ATS विरोधात निदर्शने करणाऱ्या पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांवर जालना,बीडमध्ये गुन्हे दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *