Rajani Patil : राजीव सातव यांच्या निधनामुळं रिक्त जागी काँग्रेसकडून रजनी पाटील यांचं नाव निश्चित
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळं रिक्त जागी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोनिया गांधींकडून या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. रजनी पाटील या माजी खासदार आहेत. त्या सध्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी आहेत. राज्यात विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव होतं. पण त्याऐवजी राज्यसभेवर संधी दिली आहे. रजनी पाटील या सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू वर्तुळातील आहेत.