Rajaram Sakhar Karkhana : घोषणाबाजीत महाडिकांनी सुद्धा ‘राजाराम’ची सभा तासभर घेऊन दाखवली! आता थेट सामना निवडणुकीमध्येच होणार

Rajaram Sakhar Karkhana : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या राजाराम साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर पार पडली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दोन्ही गटाकडून घोषणाबाजी होत असतानाच कारखान्याची सभा तासभर चालली. त्यामुळे गोकुळनंतर लक्ष लागलेली ही सभाही तासभर चालली. 

कारखान्याची आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी ही शेवटची सभा होती. सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयाला हात उंचावत आणि मंजूर मंजूर अशा घोषणा देत मान्यता दिली. दुसरीकडे विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने समांतर सभा घेत सत्ताधारी आघाडीने सभासदांचा आवाज दाबल्याचा आरोप केला. सत्ताधाऱ्यांनी सभासदांना प्रश्न विचारू न देता सभासदांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. कारखान्यासाठी आमचा लढा सुरूच राहील असे परिवर्तन आघाडीमधील आघाडीतील नेत्यांनी भाषणात सांगितले.

कारखाना विस्तारासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज मंजूर  

राजारामचे संचालक अमल महाडिक यांनी कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी जिल्हा बँकेकडून 129 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्या माध्यमातून कारखान्याचे विस्तारीकरण, सहवीज प्रकल्प व इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची उभारणी होईल, सहवीज प्रकल्प 2024 मध्ये कार्यान्वित होईल अशी घोषणाही महाडिक यांनी यावेळी केली. सभेला सुरुवात होण्याअगोदर अर्धा तास विरोधी सभासदांचे सभास्थळी आगमन झाले. त्यावेळी सत्ताधारी समर्थकांनी जागा व्यापल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. प्रत्युत्तरात सत्ताधारी आघाडीकडून घोषणाबाजी झाली. 

बावड्यास 122 गावातील सभासद हे कारखान्याचे खरे मालक असून हा कारखाना कोणा एकट्याचा नाही, अशा शब्दात अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना टोला लगावला. 

घोषणाबाजीमुळे काही काळ गोंधळ 

सभासदांकडून एकूण 21 प्रश्न विचारण्यात आले होते. लेखी उत्तर देण्यासह वाचनही यावेळी करण्यात आले. एक ते 16 पर्यंत प्रश्न उत्तरांचे वाचन सुरू असताना सत्ताधारी सभासदांकडून मंजूरच्या घोषणा सुरू होत्या. 16 व्या प्रश्नाचे वाचन सुरू असतानाच विरोधी आघाडीच्या सभासदांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर सत्ताधारी समर्थकांनी सुद्धा घोषणा दिल्या. यावेळी विरोधी गटाकूडन आमदार सतेज पाटील यांचे फोटो उंचावून घोषणाबाजी केल्यानंतर सत्ताधारी गटाकडून संचालक अमल महाडिक यांना खांद्यावर घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *