Sangli Crime : जीपचा टप एकीकडे, खालचा भाग दुसरीकडे; सांगली- नांद्रे रोडवर भीषण अपघातात दोन तरुणांचा करूण अंत 

Sangli Crime : मिरज तालुक्यातील नांद्रे येथील सांगली-नांद्रे राज्यमार्ग वरील नांद्रे येथील दर्गाह चौकात भीषण अपघात झाला. मध्यरात्री झालेल्या झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा करूण अंत झाला. हा अपघात इतका भीषण होता, की जीपवरील टप एका बाजूस निघून पडला. तर जीपच्या खालच्या बाजूचा भाग दुसऱ्या बाजूला जाऊन पडला. या भीषण धडकेत खटाव गावचे दोन 21 वर्षाचे तरूण हे जागीच ठार झाले. तर इतर 6 जणांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महिंद्रा जीपमधून एकूण 8 तरूण मध्यरात्री सांगलीहून खटावकडे भरधाव वेगाने जात असताना ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. नांद्रेमधील दर्ग्याच्या नजीकच्या बाहुबले यांच्या घरासमोरील लोखंडी पोलवर जीपने जोरदार धडक दिली. यामध्ये लोखंडी पोल वाकवत जीप फरफटत जाऊन दर्ग्याच्या भिंतीवर आदळली.

इतर महत्वाच्या बातम्या 

Leave a Reply

Your email address will not be published.