Sanjay Nirupam on Majha Katta:मोदींच्या लोकप्रियतेची निरूपम यांनाही भुरळ ? ‘माझा कट्टा’वर खास गप्पा

Sanjay Nirupam on Majha Katta:मोदींच्या लोकप्रियतेची  निरूपम यांनाही भुरळ ? ‘माझा कट्टा’वर खास गप्पा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने हट्टाने मुंबईतील सहापैकी पाच लोकसभा मतदारसंघ स्वत:ला मागून घेतले आहेत. पण ठाकरे गटाची ताकद पूर्वीइतकी राहिलेली नाही. त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने उभे केलेल्या पाचही उमेदवारांचा पराभव होईल, असे संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी म्हटले. मी हे भाकीत आत्ताच करुन ठेवत आहे. मुंबईतील एकाही मतदारसंघात ठाकरे गट जिंकू शकत नाही. हे माझं चॅलेंज आहे. 2022 पूर्वी असणारी शिवसेना आता राहिलेली नाही. ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. त्याचा कोणताही विचार न करता उबाठा गटाने (Uddhav Thackeray camp) मुंबईतील लोकसभेच्या पाच जागा मागून घेतल्या आहेत. मात्र, या सर्वठिकाणी ठाकरे गटाचा पराभव होईल, असे निरुपम यांनी म्हटले. ते मंगळवारी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *