Sanjay Raut on Jalna : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज फडणवीसांच्या आदेशानं? राऊतांचा आरोप काय?

जालना :  जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये रेटारेटी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज (Jalna Police LathiCharge) केला. उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार (Firing) केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची स्थिती आहे. घटनास्थळी दगडांचा खचही असल्याचे दिसून आले आहे. उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात  येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार यांनी या लाठी हल्ल्याचा निषेध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *