Savitribai Phule Jayanti: देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करणार्‍या सावित्रीबाई फुलेंचा संघर्ष सोपा नव्हता..

Savitribai Phule Jayanti: भारतात स्त्री शिक्षणाचा विचार जेव्हा येतो तेव्हा पहिलं मनात नाव येतं ते म्हणजे सावित्रीबाई फुले. आज देशातील सर्व राजकीय पक्ष महिलांच्या शिक्षणाबद्दल वेगवेगळे दावे करीत आहेत, पण त्याचा पाया सावित्रीबाई फुले यांनी 19व्या शतकातच घातला होता. सावित्रीबाई फुले समाजसेविका आणि शिक्षिका होत्या. ज्यांनी शिक्षण मिळवून केवळ समाजातील वाईट प्रवृत्तींचाच पराभव केला नाही, तर जेव्हा समाजात अनेक प्रकारचे लिंगभेद होते अशा वेळी भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे महान काम केले आहे.

19व्या शतकात शिक्षणासाठी संघर्ष
एकोणिसाव्या शतकात समाजात पसरलेल्या महिला हक्क, शिक्षण, अस्पृश्यता, सतीप्रथा, बालविवाह, विधवा-विवाह आणि अंधश्रद्धा या विरोधात सावित्री फुले यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत संघर्ष केला. दोघांनीही 1848 मध्ये पुण्यात देशातील पहिली आधुनिक महिला शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनीही जातीवाद, अस्पृश्यता आणि लिंगभेदाविरूद्ध लढा दिला आहे.

सावित्रीबाईचे लग्न अगदी लहान वयातच झाले होते. 1940 मध्ये जेव्हा ती फक्त 9 वर्षांची होती, तेव्हा तिचे लग्न 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाले. दोघांनाही मूलबाळ नव्हते म्हणून त्यांनी यशवंतरावला दत्तक घेतले. पती ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे दिले. सावित्रीबाई शिक्षित झाल्यानंतर त्यांना इतर मुलींनाही शिकवायला सुरुवात केली. 1848 मध्ये जेव्हा फुले दाम्पत्याने पुण्यात शाळा सुरू केली. तेव्हा 9 मुलींनी या शाळेत प्रवेश घेतला होता. सावित्रीबाई त्या शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या.

शिक्षणाशिवाय सावित्रीबाईंनी इतर अनेक सामाजिक सुधारणांचा कार्यक्रम चालविला. 19व्या शतकात हिंदूंमध्ये प्रचलित बालविवाहाविरूद्ध लोकांना जागरूक करण्याचे कामही त्यांनी केले. त्यांच्या मुलासह त्यांनी पुढे समाजासाठी चांगले कार्य केले. 1897 मध्ये सावित्रीबाई व त्यांचा मुलगा यशवंतराव यांनी प्लेगच्या रूग्णांच्या उपचारासाठी रुग्णालय सुरू केले होते. पुण्याच्या या रुग्णालयात यशवंतराव रूग्णांवर उपचार करायचा आणि सावित्रीबाई रुग्णांची काळजी घेत असत. यावेळी त्या देखील आजारी पडल्या आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

संघर्ष सोपा नव्हता
त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षित करण्याचा विचार केला तेव्हा त्यांना सर्वत्र विरोधाचा सामना करावा लागला. या कामामुळे लोकं त्यांना लक्ष्य करत होते. जेव्हा त्या शिकवायला जात असे तेव्हा लोक त्यांच्यावर चिखलफेक करीत असत. या कारणास्तव, त्या नेहमीच स्वतःबरोबर साडी ठेवत असे, जेणेकरुन त्यांच्या कार्यात खंड पडायला नको.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *