Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 मार्च 2021 | मंगळवार | एबीपी माझा

 

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 मार्च 2021 | मंगळवार | एबीपी माझा

  1. कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या सिस्टिम हॅक करण्याचा चीनचा प्रयत्न, मुंबईतल्या बत्ती गुल प्रकरणामागेही चीनचाच हात असल्याचा संशय
  2. पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसनंतर आता सीएनजी – पीएनजीही महागलं, पीएनजी ०.९१ पैशांनी तर सीएनजी ०.७० पैशांनी महाग
  3. संजय राठोडांनी राजीनामा दिला, तसा धनंजय मुंडे यांनीही द्यावा, भाजपच्या मागणीचा पंकजा मुंडेंकडून पुनरुच्चार, चुकीच्या गोष्टींना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप
  4. मणक्याला आणि डोक्याला जबर दुखापत झाल्यानं पूजा चव्हाणचा मृत्यू, सविस्तर शवविच्छेदन अहवाल वानवडी पोलिसांना प्राप्त
  5. औरंगाबादमध्ये मास्क कारवाईदरम्यान महापालिकेच्या पथकावर हल्ला, हल्लेखोरांमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश, कठोर कारवाईची मागणी
  6. पंतप्रधान किसान योजनेवरुन राज्यातील कृषी आणि महसूल विभागात मानापमान नाट्य, फक्त कृषी विभागाचा सन्मान झाल्याने महसूलचे अधिकारी नाराज, काम न करण्याचा निर्णय
  7. ऐन अंगारकीच्या मुहूर्तावर भाविक बाप्पाच्या थेट दर्शनाला मुकणार, मुंबईतील सिद्धिविनायक, पुण्यातील दगडूशेठसह इतर प्रसिद्ध संस्थानांकडून दर्शनावर निर्बंध
  8. सलग पाचव्या महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटींहून अधिक जीएसटी जमा, तिसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीतही वाढ
  9. शाळांच्या फी वाढीला मनाई करणाऱ्या अध्यादेशावरील स्थगिती हायकोर्टानं उठवली, पालकांसह सरकारलाही मोठा दिलासा

 

  1. विराट कोहलीची अनोखी सेन्चुरी, इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स, एवढे चाहते असणारा जगातील एकमेव क्रिकेटर

 

Leave a Reply

Your email address will not be published.