Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 05 जुलै 2021 | सोमवार | ABP Majha

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 05 जुलै 2021 | सोमवार | ABP Majha

  1. आजपासून विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन, केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ठराव येण्याची शक्यता

  1. विधानसभेच्या पूर्वसंध्येला चहापानासह मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही नाही; विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र

  1. शिवसेनेशी आमचे वैचारिक मतभेद, आमच्यात कधीही शत्रुत्व नव्हतं; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य

  1. महाविकासआघाडी सरकारकडून प्रसिद्धी मोहिमेवर 155 कोटी रुपयांचा खर्च; आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती, सोशल मीडियावरही तब्बल 6 कोटींचा खर्च

  1. स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग, एमपीएससी परीक्षांसंदर्भात समिती गठित; समिती राज्य सरकारला अहवाल देणार

  1. आपल्याविरोधात कारवाई करू नये, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका; देशमुखांच्या वकिलांची माहिती

  1. रविवारी महाराष्ट्रात केवळ 3 हजार 378 रुग्णांना डिस्चार्ज तर 9 हजार 336 नव्या रुग्णांची नोंद ; राज्यातील 38 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही

  1. नागपुरात अल्पवयीन मुलाकडून 14 वर्षीय मुलीकडे खंडणीची मागणी , 50 लाख रुपये न दिल्यास आई-वडिलांची हत्या करण्याची धमकी; आरोपीसह साथीदार जेरबंद

  1. हिंदू-मुस्लीम वेगळे नाहीत, सर्व भारतीयांचा डीएनए एकच; मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य

  1. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आज सीईओपद सोडणार, अंतराळ पर्यटनाकडे लक्ष केंद्रीत करणार

Leave a Reply

Your email address will not be published.