ST strike: जव्हारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांन विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पालघर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची आग्रही मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दिवाळीपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून अद्यापही संपावर तोडगा काढण्यात आला नाही. मात्र आतापर्यंत 37 हून अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून संप मिटावा यासाठी प्रशासकीय पातळीवर बैठका सुरु आहेत.

बस आगारातील तरुण वाहक दीपक खोरगडे  (30 वर्षे) या बस कंडक्टर (वाहक) याने शनिवारी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर जव्हार कुटीर रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली.

दरम्यान एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होणार नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले असून सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही तोवर कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही असं सांगण्यात आलं आहे. त्यातच आहे त्या पगारात सुखी राहा असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले, हे ऐकताच मानसिक स्थिती बिघडल्याने आत्महत्याचा प्रयत्न केला, असे जबाब पीडित रुग्णाने जव्हार पोलिसांना दिला आहे.

दरम्यान, आझाद मैदानावरील आंदोलनात शेकडो कर्मचारी सहभागी झालेत. मात्र, शुक्रवारी आंदोलकांची संख्या निम्यानं कमी झाल्याचं पाहायला मिळालं. महत्वाचं म्हणजे, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय. रेल्वेच्याही मर्यादीत गाड्या सुरू आहेत. त्यामुळं हजारो विद्यार्थ्यांची कोंडी झालीय. याशिवाय, अनेक विद्यार्थ्यांना परीक्षांपासूनही त्यांना वंचित राहण्याची वेळ आलीय.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हे देखील वाचा- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *