ST Workers | एसटीच्या चार हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, उत्पन्न नसल्याने सेवा स्थगितीचा निर्णय

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं असल्याची बातमी खोटी आहे, एसटी महामंडळाने पुढील वाटचालीसाठी भरती प्रक्रिया सुरु केली होती. परंतु अद्याप कोणालाही पत्र देण्यात आलं नव्हतं. केवळ निवड करण्यात आली होती. आम्हांला जसजशी गरज लागते त्यानुसार आम्ही घेत असतो. परंतु लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं अत्यावश्यक सेवा सोडून काम बंद आहे. त्यामुळे आम्ही फ़क्त स्थगिती दिली आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. हे सर्व कर्मचारी वेटिंग लिस्ट वरील आहेत, जोपर्यंत एसटी पूर्णपणे सुरु होतं नाही तोपर्यंत आम्ही भरतीला स्थगिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published.