Supriya Sule :  भाजप हा जनता पक्ष होता, मात्र आता हा ‘लाँड्री’ झालीय; सुप्रिया सुळेंची खोचक टीका

Supriya Sule In Pune :  भाजप हा आधी पक्ष होता मात्र आता हा पक्ष लाँड्री झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी केली आहे. त्या पुण्यात (Pune) बोलत होत्या. त्यांच्यात आणि आमच्यात अनेक वर्षांपासून वैचारिक मतभेद होते मात्र नात्यांमध्ये कटूता नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपमध्ये त्यांचे खरे नेते नाहीत तर बाहेरच्या पक्षातून आलेले नेतेच अधिक आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या अनेक व्यासपीठावर तेच दिसतात. राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस या पक्षातून अनेक बडे नेते भारतीय जनता पक्षात गेले. त्यांना पक्षाने मोठी संधी दिली असं म्हणत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार देखील मानले आहेत.

पुणे शहर बदलतंय ही टॅगलाईन बरोबर: सुप्रिया सुळे
पुणे शहर बदलतंय ही टॅगलाईन बरोबर आहे. पुणं खऱ्या अर्थांनं बदलत आहे. हे आपण पाहतोच आहोत. कचरा, पूर स्थिती, पाणी तुंबणं अशा गोष्टी कधीच होत नव्हत्या त्या गोष्टी आता घडत आहेत. त्यामुळे पुणे शहर बदलतंय या टॅगलाईनकडे आपण चांगल्या अर्थाने बघितलं मात्र बदलेलं पुणं आपण सगळेच बघत आहोत, असं मत त्यांनी पुण्यातील प्रश्नांवर स्पष्ट केलं आहे.

मागील पाच वर्षात कचऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे. पुणं हे शहर शिक्षणाचं माहेरघरच नाही तर राहण्यायोग्य शहर होतं. अशा हरीत आणि सुरक्षित पुण्यात जनतेने घरं विकत घेतली. मात्र त्यांना आता फार अडचणींना सामोरं जावं लागत आहे. नागरिकांना अडचणीत टाकण्याचं पाप या पाच वर्षात सत्तेत असणाऱ्यांनी केलं आहे, असा आरोप त्यांनी पाच वर्ष महापालिकेत सत्तेत असणाऱ्या भाजपवर केला आहे.

स्मार्ट सीटी हा उपक्रम फेल आहे. यात शहर स्मार्ट होत नाही तर काही परिसर स्मार्ट केला जातो. त्यात स्वच्छता आणि विविध उपाययोजनांचा यात समावेश असतो. ज्या पद्धतीने पुण्यात काहीही नियोजन न करता कामं किंवा योजना राबवल्या जात आहे. त्याचेच परिणाम पाच वर्षांत आपण बघितले आहेत. पुण्यात गाडीतून मुंबई गाठणं सोपं आहे मात्र पुणे शहरात फिरणं कठिण झालं आहे, अशी परिस्थिती आहे. आम्ही कोणत्याही विकास कामांच्या विरोधात नाही मात्र विकास करताना त्याच्या नियोजनाचाही विचार केला असता तर पुणेकरांचे हाल कमी झाले असते. महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यातून अनेक तास गाडीतून प्रवास करणं अवघड आहे. पाणी, कचरा, वाहतूक कोंडी या सगळ्या समस्या पुणेकरांसमोर आहेत, असंही त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या-

Raj Thackeray Letter to Devendra Fadnavis : भाजपनं निवडणूक लढवू नये; अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *