Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ आप आक्रमक, बदली विरोधात नागपुरात आंदोलन

मुंबई : ठाकरे सरकारकडून बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं तुकाराम मुंढे यांच्या नावाचा समावेश आहे. नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्या बदलीनंतर आप आक्रमक झाली आहे. आज चार वाजता आम आदमी पार्टीकडून मुंढे यांच्या समर्थनार्थ आणि बदलीच्या विरोधात नागपुरात आंदोलन करणार आहेत. तुकाराम मुंढे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांनी स्वतःला घरीच आयसोलेट केलं आहे.

राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. ज्या शहरात तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून किंवा प्रशासकिय अधिकारी म्हणून गेले, तिथं त्यांना स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी निवड झाल्यापासूनच मुंढे यांचे नगरसेवकांशी वाद सुरु झाला होता. सर्वपक्षीय नगरसेवकांचा तुकाराम मुंढे यांना विरोध होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तुकाराम मुंढे यांच्या नावाला पंसती दिल्यामुळे महाविकासआघाडीतील नगरसेवकांना काही करता येत नव्हते. दरम्यान, नागपुरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध घातले होते. मात्र यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद पाहायला मिळाले.

नागपूर महापालिकेला कोरोनाचा विळखा! आयुक्त तुकाराम मुंढेंनंतर अनेकांना कोरोनाची लागण

तुकाराम मुंढे यांच्या बदल्या

 • सोलापूरचे प्रकल्प अधिकारी (ऑगस्ट 2005 ते ऑगस्ट 2007)
 • नांदेडचे उपजिल्हाधिकारी (सप्टेंबर 2007 ते डिसेंबर 2007)
 • नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जानेवारी 2008 ते मार्च 2009)
 • नाशिकच्या आदिवासी विभागाचे आयुक्त (मार्च 2009 ते जुलै 2009)
 • वाशिमचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जुलै 2009 ते मे 2010)
 • मुंबई खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जून 2010 ते जून 2011)
 • जालन्याचे जिल्हाधिकारी (जून 2011 ते ऑगस्ट 2012)
 • मुंबई येथे सहाय्यक विक्रीकर आयुक्त (सप्टेंबर 2012 ते नोव्हेंबर 2014)
 • सोलापूरचे जिल्हाधिकारी (नोव्हेंबर 2014 ते एप्रिल 2016)
 • नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त (मे 2006 ते मार्च 2017)
 • पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष ( मार्च 2017 ते फेब्रुवारी 2018)
 • नाशिक महापालिकेचे आयुक्त (फेब्रुवारी 2018 ते नोव्हेबर 2018)
 • 2018 नियोजन विभाग, मंत्रालय
 • 2019 एडस नियंत्रण प्रकल्प संचालक
 • 2020 नागपूर महापालिका आयुक्त

Tukaram Munde | नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

Leave a Reply

Your email address will not be published.