UNIVERSITY EXAMS| परीक्षा अनिवार्य,UGCचं कायद्यावर बोट,दारुविक्री चालते मग परीक्षा का नको UGCचा सवाल

नवी दिल्ली : परीक्षा घ्याव्यात हे यूजीसी आज सांगत नाही हे 29 एप्रिलपासून सांगत आहे. आतापर्यंत आमची अपेक्षा होती की वेगवेगळ्या विद्यापीठांनी त्याची तयारी सुरू केली असेल. आम्हाला या गाईडलाईन्स रिवाईस कराव्या लागल्या. कारण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जुलैमधे ते शक्य नव्हतं, असं यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षांवर यूजीसीची पहिली प्रतिक्रिया एबीपी माझाला मिळाली. यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.