Web Exclusive | भारत बायोटेकच्या लसीसंदर्भात बेळगावच्या डॉ. अमित भाटे यांच्याशी संवाद

करोनावरील आजारासाठी तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता वर्तवले जात आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकनं आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे. ह्या लसीचे परिक्षण बेळगावच्या एका सुपर स्पेशालीटी हाॅस्पीटलसह देशात १३ ठिकाणी ७ जुलै पासून सूरू होत आहे. बेळगांवाच्या सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटल मध्ये सध्या सूरू असलेल्या तयारीतून भारत बायोटेकच्या लसी संदर्भातल्या अनेक प्रश्नांची एबीपी माझाने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.