‘नीट’ च्या परीक्षेत देशातून प्रथम क्रमांक पटकावूनही शुभान सेनगुप्ताने व्यक्त केली खंत; परीक्षेची काठिण्य पातळी वाढविण्याची ही मागणी 

Nagpur News नागपूर : नीटच्या परीक्षे (NEET-UG Final Result) संदर्भात जो काही गोंधळ निर्माण झाला होता, तो या परीक्षेच्या पुनर्निकालानंतर काहीसा दूर झाला आहे. नागपूरचा (Nagpur News) शुभान सेनगुप्ता चार जूनला पहिल्यांदा निकाल आला, तेव्हाही त्याला 720 पैकी 720 गुणांसह देशात पहिला होता. तर पुनर्निकालामध्ये ही शुभान सेनगुप्ता पहिल्या क्रमांकावरच कायम आहे. मात्र त्याने पुनर्परीक्षा दिलेली नाही. त्यामुळे नीट च्या परीक्षेत (NEET Result) संदर्भात गेले 50 दिवस जो काही गोंधळ झाला होता, त्यामुळे देशात पहिला येऊनही तेव्हा सेलिब्रेट करता आलं नव्हतं. आता मात्र आम्ही सेलिब्रेट करू असं शुभान सेनगुप्ताचं म्हणणं आहे.

देशातून प्रथम, तरीही व्यक्त केली खंत 

दरम्यान, नीट च्या परीक्षेचा यंदाचा पेपर फार सोपा होता. नीट सारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेची काठीण्य पातळी वाढवली पाहिजे, असंही शुभानला वाटतंय. तसेच एंटीएने या परीक्षे संदर्भातील पारदर्शकताही वाढवावी, कारण देशातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय या परीक्षेसंदर्भात प्रचंड अपेक्षा ठेवून असतात असंही शुभानचं म्हणणं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) नीटबाबत आपला निकाल दिल्यानंतर नुकतेच नॅशनल टेस्टींग एजन्सीने (National testing Agency) NEET-UG परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल जाहीर केला आहे. NEET UG  exams.nta.ac.in/NEET/ या नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला असून भौतिकशास्त्राचे देण्यात आलेले बोनस मार्क परत घेण्याच्या निर्णयानंतर या निकालात सुधारणा करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट यूजीचा सुधारित निकाल दोन दिवसांच्या आत जाहीर केला जाईल असे सांगितले होते. त्यानंतर हा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे. नीट युजीचा हा अंतिम निकाल असून अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहे.

नेमका प्रकार काय?

गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा आहे. मे महिन्यात ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत पेपरफुटीसह गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 40 पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय चाचणी संस्थेला अर्थात एनटीएला केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एनटीएकडून NEET UG परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आला.

यंदाच्या नीट परीक्षेचा पेपर झारखंडमधील हजारीबाग शहरात परीक्षेच्या 45 मिनिटं आधी फोडण्यात आला. त्यानंतर या पेपरमधील प्रश्नांची उत्तरं विकण्यात आल्याचा दावा एनटीएने न्यायालयात केला होता. या दाव्याविषयी सर्वोच्च न्यायालयाकडून शंका उपस्थित करण्यात आली होती. फक्त 45 मिनिटांत 180 प्रश्नांची उत्तरं सोडवून ती पेपर विकत घेणाऱ्यांना पुरवण्यात आली. ही उत्तरं पाठ करून विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला, या एनटीएच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

हे ही वाचा 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *