भाजपमधील खदखद आमच्यापर्यंत पोहोचली, योग्य वेळी पोस्टमार्टम करू – नाना पटोले

Nana patole : नागपूर भाजपचे मंत्र्यांना विचारा लोकशाही आहे की ठोकशाही. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्याबद्दलही वक्तव्य केले जातात.कारण आमच्या पक्षात लोकशाही आहे. आमच्याकडे हुकूमशाही नाही, भाजपमध्ये हुकूमशाही आहे. आतमध्ये खदखद आहे.भाजपमधील खदखद आमच्यापर्यंत पोहोचत आहे. योग्य वेळी प्रॉपर पोस्टमार्टम करू. यांना रोज रोज छोटे हतोडे मारू द्या. आम्ही एकच मोठा हातोडा मारू आणि त्या दिवशी यांना कळून जाईल. रोज भूकंपाच्या गोष्टी करणाऱ्यांना आम्ही तो भूकंप एका दिवसात करून दाखवू, असे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते.
भाजपचा पराभव निश्चित –
भाजपची पराभव निश्चित आहे. मोदी पंतप्रधान कमी आणि प्रचारक म्हणून जास्त फिरत आहेत. महाराष्ट्र भाजपसाठी सर्वात कमजोर राज्य झालेलं आहे.
देश तोडण्याचा काम जेव्हा जेव्हा झालं. तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने आणि देशाला लोकशाही वाचवण्यासाठी ताकद दिली आहे. संविधानिक व्यवसायाला संपवण्याचे काम भाजप करत आहे. जनतेने ताकद देण्याचा संकल्प केला आहे, असे पटोले म्हणाले.
मोदींवर हल्लाबोल –
डॉक्टर मनमोहन सिंह हे पंतप्रधान असताना ही योजना मंजूर झाली होती. त्याच योजनेच्या आज नरेंद्र मोदी हे चाव्या द्यायला आले. त्यांना त्यासाठी दहा वर्षे लागले.भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे पंतप्रधानांनी खोटे बोलाव रेटून बोलावं असं करू नये, असा टोला पटोले यांनी लगावला.
नवीन गाईडलाईन
महाराष्ट्रातील भाजपचे शैक्षणिक धोरण म्हणजे जिल्हा परिषद शाळा बंद करणे. ग्रामीण भागातील आणि गरिबांचे मुले कुठे शिकणार? दीडशे रुपयांचं धान्य देऊन मोफत धान्य देण्याचा दावा करायचा. काँग्रेसने धान्य दिलं, मात्र प्रचार केला नाही. त्यासोबत रोजगार दिला. फुकट तांदूळ मका गहू देऊन गरीबाची चेष्टा करण्याचे काम भाजप करत आहे. आर्थिक कमजोर करून शैक्षणिक व्यवस्था संपवण्याचा काम भाजप करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला.
प्रकाश आंबेडकरांबद्दल काय म्हणाले ?
पृथ्वीराज चव्हाण यांना काही माहिती असेल. खरगे यांच्यासोबत ते बोलले असतील, त्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल मत मांडलं असेल, असे पटोले म्हणाले.
माझ्याच नेतृत्वात काँग्रेस राज्यात निवडणुका लढवणार –
मी अगोदर पासून सांगत होतो, माझ्या नेतृत्वात निवडणुका होणे म्हणजे काँग्रेसचा विजय आहे. काँग्रेस हायकमांडने तो निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथला यांनीही मीडियाला जाहीर करून सांगितलं. सर्व निवडणुका नाना पटोले यांच्या नेतृत्वात होणार आहेत. ज्येष्ठ नेते आणि आम्ही काँग्रेसच्या विजयाची पताका फडकवू. हा विश्वास आहे, असे पटोले म्हणाले.
भाजपवर हल्लाबोल –
भाजपच्या बोलण्यात आणि कृतीत मोठा फरक आहे. देशासाठी गौरव करणाऱ्या मुलींची धिंडवडे काढले ते आपण पाहिले आहे. रामायण सीतेमुळे घडलं आणि महाभारत द्रौपदीमुळे घडलं.. ज्यांनी ज्यांनी सीतेची चेष्टा केली.. द्रौपदीची चेष्टा केली… त्यांचा सर्वनाश झाला. असा महाभारताचा पुरावा देत भाजपवर निशाणा साधला. भाजप दिखावा करण्यासाठी बोलत आहे. आज महिलांना घर चालवावं लागतं. महागाईच्या काळात महिलांचा पदोपदी अपमान करण्याचं काम भाजप करत आहे. महिलांचा सन्मान करण्यासाठी महागाईवर बोलावं या सगळ्यांचे उत्तर महिला भाजपला देईल, असे पटोले म्हणाले.
अधिक पाहा..