महिलांनी अमृता फडणवीसांना रोल मॉडेल माना, देवेंद्र फडणवीस केस कापायलाही त्यांना विचारुन जातात : पुरुषोत्तम खेडेकर
बुलढाणा: प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना रोल मॉडेल मानलं पाहिजे. महिलांनी स्वतःची उंची स्वतः ठरवली पाहिजे असा सल्ला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी महिलांना दिलाय.काल बुलढाण्यात झालेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात ते बोलत होते.
ब्राह्मण महिलांनी ज्याप्रमाणे अन्याय , अत्याचार झुगारून दिलेत त्याप्रमाणे प्रत्येक महिलांनी स्वतःची उंची स्वतः ठरवली पाहिजे. महिला या मोठा बदल घडवू शकतात. ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केसं कापायलाही जायचं असेल तर ते त्यांना विचारून जातात त्याप्रमाणे महिलांनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं पाहिजे . त्यामुळे मी तर म्हणेल की , प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिज, असा सल्ला ही पुरुषोत्तम खेडेकर यांनी महिलांना दिला आहे.
मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांची स्पष्टोक्ती
राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं पुर्नसर्वेक्षण करून जर अहवाल सकारात्मक आला आणि जर त्यात असे आलं की, मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेला आहे आणि ओबीसीस पात्र आहे तर राज्य सरकारने त्यांच्या आधिकरातून ओबिसीतून आरक्षण द्यावे. अन्यथा EWS शिवाय मराठा समाजाला पर्याय नाही. तसेच मराठा समाजाने ओबीसींच्या पात्रता पूर्ण केल्या असल्याने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे ही मागणी संवैधानिक असून ओबीसी कोण..? ते काय जन्माने सातबारा घेऊन आलेत का असा सवाल मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला आहे.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य
- पुरुषोत्तम खेडेकर यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर अप्पा साहेब यांच्यापेक्षा अनेक चांगली लोक जगात आहेत अशी तीव्र शब्दात टीका केली होती.
- 12 जानेवरी रोजी जिजाऊ जन्मोत्सवाच्या मेळाव्यात त्यांनी मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, असं वक्तव्य केलं होतं.
- मविआ सरकारच्या काळात त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना केंद्र सरकार राज्यपालांची पाठराखण करत असल्याचा आरोप केला होता.
- अनेकदा त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.
[embedded content]
हे ही वाचा :