मोठी बातमी! मराठा आरक्षणावर विधानसभेत आज चर्चा होणार, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

नागपूर : राज्यात मागील तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना, नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी बॅनर पहायला मिळाले होते. दरम्यान, राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज विधानसभेत चर्चा होणार आहे. 293 अनवये मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. अंदाजे दुपारनंतर ही चर्चा होणार आहे. मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यत सरकारला मुदत दिल्यानंतर आज सत्ताधारी पक्षाचे नेते मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे अधिवेशनात आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी होत होती. तसेच, अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अधिवेशनात चर्चा होणार आहे. त्यामुळे सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज कोणती भूमिका मांडली जाते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *