Sujay Vikhe Patil : निवडणूक लागू द्या, विरोधकांच्या लफड्यांचे व्हिडीओ दाखवतो :सुजय विखे : ABP Majha
एकदा निवडणूक लागू द्या, मग विरोधकांनी काय काय लफडे केले याचे व्हिडिओ बाहेर काढतो..असा इशारा भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना दिलाय.. खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके तसंच भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळे सुजय विखेंचा रोख हा आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांच्याकडे तर नाही ना? असा सवाल उपस्थित होतोय….