MNS: राजकीय ढोंगीपणाच्या ‘नकाब’चा ‘जवाब’ द्यावाच लागेल, मनसेचा सरकारला इशारा
मुंबई: नवाब मलिकांच्या (Nawab Malik) महायुतीतील सहभागाला विरोध करत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहलं. यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. सरकार एकत्र असताना पत्र लिहण्याची काय गरज पडली असा सवाल यावेळी सरकारला करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांचा एकत्रित फोटो ट्वीट करत मनसेनं सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय ढोंगीपणाच्या नवाबचा जवाब जनतेला द्यावाचं लागेल असा इशारा मनसेनं सरकारला दिलाय.
मनसे आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड? ‘नवाब’चा ‘जवाब’ द्या की नका देऊ पण. तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या ‘नकाब’चा ‘जवाब’ तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल.
इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं ? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड ?
‘नवाब’चा ‘जवाब’ द्या कि नका देऊ पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या ‘नकाब’चा ‘जवाब’ मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल नाहीतर जनता अगदी योग्यवेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल ! pic.twitter.com/bee7Omzc4p
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 8, 2023
नवाब मलिक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी बाकांवर बसले. त्यावरुन महायुतीतला मोठा भाऊ असलेल्या भाजपनं आक्षेप घेतला. पण दुसऱ्या दिवशीही नवाब मलिक सत्ताधारी बाकांवरच बसून होते. त्यामुळं मलिक नेमकं सत्तेत आहेत कि विरोधात हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मलिकांना विरोध करण्याची भूमिका भाजपनं कायम ठेवली आहे. पण अजित पवार गटानं मात्र संभ्रमात टाकणारी वक्तव्ये केली आहेत.
मलिक आणि अजित पवारांमध्ये 15 मिनिटे चर्चा
नवाब मलिकांवरुन भाजप-अजित पवार गटात संभ्रम निर्माण झाल्यानंतर आज प्रफुल पटेलही नागपुरात पोहोचले. प्रफुल पटेलांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मलिक आणि अजित पवारांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली मात्र ही चर्चा माध्यमांसमोर सांगायला प्रफुल पटेलांनी नकार दिला. फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्राचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही उमटले. जाहीर पत्रावरुन अजित पवार गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी-विरोधकांच्या या आरोप-प्रत्यारोपांमध्ये गोची मात्र अजित पवार गटाची झाली आहे.
हे ही वाचा: