Farmers Protest : बारामतीत अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा , Amol Kolhe यांच्याशी बातचित
Farmers Protest : बारामतीत अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा , Amol Kolhe यांच्याशी बातचित
खासदार अमोल कोल्हे यांची आक्रोश मोर्चा रॅली ही आज बारामती लोकसभा मतदारसंघात असणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता अमोल कोल्हे दौंड शहरातील महात्मा फुले पुतळा ते शिवाजी महाराज पुतळा अशी पदयात्रा करतील. आजच्या संपूर्ण दौऱ्यात अमोल कोल्हे यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील असणार आहेत. पदयात्रेनंतर दौंड तालुक्यातील खडकी येथे कोपरा सभा होईल… त्यानंतर रॅली इंदापूर तालुक्यातील भिगवन येथे येईल तिथे कोल्हे छोटी सभा घेतील. त्यानंतर इंदापूर येथे पदयात्रा करतील तसेच इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे छोटेखानी सभा करून ते बारामती येथे जाणार आहेत. बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी त्यांचे स्वागत होईल त्यानंतर बारामती शहरात त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.