जगप्रसिद्ध छायाचित्रकार भारत दौऱ्यावर, Sandro Miller आणि Mark Edward Harrid प्रथमच भारतात

चित्र आणि फोटो दोन्ही बोलके असतात…अनेक गोष्टी ह्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही करत असतो… आणि हेच माध्यम शिकवण्यासाठी जगातील दोन प्रसिद्ध फोटोग्राफर्स भारतात दाखल झाले आहेत…. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या दिग्गज छायाचित्रकार सांड्रो मिलर आणि मार्क एडवर्ड हॅरिस यांना चित्रकार रचना दर्डा यांनी निमंत्रित केले आहे… फोटोग्राफीत अनेक बदल होतायत, तंत्रज्ञान बदलतंय… सोबतच प्रकाशयोजनांचा कसा वापर करावा हे तंत्रज्ञान त्यांच्याकडून शिकवलं जातंय… त्यांच्या भारतातला अनुभव कसा होता? सोबतच शिकवताना कोणत्या गोष्टी छायाचित्रकाराने आत्मसात कराव्यात यासंदर्भात सांड्रो मिलर, मार्क हॅरिस आणि चित्रकार रचना दर्डा यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *