State Police Force : राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर करण्यात येणार
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला.. आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत १७ मोठे निर्णय घेण्यात आले…तर गेल्या तीन दिवसांत सरकारने जवळपास ७२ मोठे निर्णय घेतले आहेत. आज घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये उद्योग, गृह विभाग, सांस्कृतिक कार्य, पशूसंवर्धन, परिवहन विभागाचा समावेश आहे..यापुढे राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला… तसेच वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.