Pankaja Munde and Dhananjay Munde Beed :पदर पसरते, मतांची भीक द्या! मुंडे बंधू बघिणीची मतदारांना साद
Pankaja Munde and Dhananjay Munde Beed :पदर पसरते, मतांची भीक द्या! मुंडे बंधू बघिणीची मतदारांना साद
Pankaja Munde Speech : “मी पदर पसरवून एवढंच म्हणेन की, शेवटची संधी मला द्या. पुढच्या वेळी तुम्हाला जो खासदार पाहिजे असेल त्याच्यासाठी रात्रंदिवस एक करेन आणि घाम गाळेन. पण मला आज शेवटची संधी द्या. मराठा बांधव असतील, धनगर बांधव असतील सर्वांना मी पदर पसरवून विनंती करत आहे. मला पैसे कमवायचे नाहीत किंवा प्रसिद्धी मिळवायची नाही. माझ्या ह्रदयात काटा घुसला”, असे भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांच्यावरही जोरदार टीका केली होती.