Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर….

Spread the love

Mumbai : शेअर रिक्षात सह प्रवाश्याकडून महिलेशी गैरवर्तन, भितीने धावत्या रिक्षातून महिलेने उडी घेतल्याची घटना बोरिवलीत घडली आहे

बोरिवली पश्चिमेकडील पोईसर येथून रेल्वे स्थानकासाठी शेअर रिक्षा आहेत. बुधवारी सकाळी पिडीत तरुणी रिक्षात बसली.

 रिक्षामध्ये आधीच एक प्रवासी बसलेला होता. रिक्षा बोरिवली रेल्वे स्थानकाकडे निघाली. रिक्षा सुरू होताच तरुणीशेजारी बसलेल्या व्यक्तीने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.

 सुरुवातीला तरुणीने दुर्लक्ष केले मात्र त्याचे चाळे थांबत नसल्याने तिने रिक्षाचालकाच्या निदर्शनास आणून त्याला रिक्षा थांबविण्यास सांगितले. 

त्याने तरुणीच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. रिक्षा चालकही थांबवत नसल्याचे पाहून तरुणीने धावत्या रिक्षामधून उडी मारली.

या घटनेत पिडीत तरुणीही किरकोळ जखमी झाली असून
 या घटनेची बोरिवली पोलिसांनी तत्परतेने दखल घेत, रिक्षाचालक आणि छेड काढणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली.