Madha Lok Sabha Election : माढाच्या निकालावर मोठमोठ्या पैजा! शरद पवार समर्थकाची थार जीपची पैज!

Spread the love

Madha Lok Sabha Election : माढाच्या निकालावर मोठमोठ्या पैजा! शरद पवार समर्थकाची थार जीपची पैज! माढा लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झालीय. आता इथल्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. आता विजय पराजयाचे दावे होतायत तशा पैजाही लागत आहेत. अकलूजच्या एका तुतारी समर्थकाने नव्या कोऱ्या थार जीपची पैज लावलीय. तर माढा तालुक्यातल्या दोन भावांनी चक्क ११ नव्या बुलेट देण्याची पैज लावलीय. आता हे आव्हान भाजप समर्थक अनुप शाह यांनी स्वीकारलंय. तुम्ही जेवढ्या बुलेटच्या पावत्या कराल तेवढ्या बुलेटच्या आपणही पावत्या करू असं आव्हान शाह यांनी दिलंय. त्यामुळे एकूण वातावरणात रंगत निर्माण झालीय.  माढा लोकसभेच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला , अकलूज मध्ये तुतारी वर नवी कोरी थार जीपची तर माढ्यात ‘तुतारी’ साठीच भावंडांनी लावली ११ बुलेटची पैज .. भाजपच्या अनुप शहा यांनी आव्हान स्वीकारल्याने आता पाटील बंधूंच्या भूमिकेकडे लक्ष