Gujarat Game Zone Rajkot Fire : गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनला आग, 30 जणांचा होरपळून मृत्यू

Gujarat Game Zone Rajkot Fire : गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनला आग, 30 जणांचा होरपळून मृत्यू

Rajkot TRP Game Zone Fire Update: नवी दिल्ली : गुजरातच्या (Gujrat) राजकोटमध्ये (Rajkot) शनिवारी (25 मे 2024) टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागली. या आगीत 32 लोकांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. राजकोटमधील गेम झोन हे गर्दीचं ठिकाण असल्यानं आग लागली त्यावेळी गर्दी होती. त्यामुळे अनेकजण होरपळल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या दुर्घटना प्रकरणी एसआयटी नेमली जाणार असून चौकशी केली जाणार आहे. 

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून यासंदर्भात माहिती दिली. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *