ABP Majha Headlines : 09 AM : 06 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

उपमुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार, मोदी आणि शाहांची भेट घेणार, उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या निर्णयावर भाजप वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याची उत्सुकता

सरकारमधून मोकळं करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांबाबत महाशक्ती काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा.. सरकारमध्ये कायम राहण्याचा महाराष्ट्र भाजपचा आग्रह

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक, काही आमदार अनुपस्थित राहण्याची शक्यता, लोकसभेतल्या सुमार कामगिरीनंतर काही आमदार संपर्कात असल्याचा शरद पवार गटाचा दावा

मोदी सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद, तर शिंदेंच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री मिळण्याची शक्यता

लोकसभेच्या निकालानंतर बैठकांचं सत्र, शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक, बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसह सर्व खासदार दिल्लीला रवाना होणार

इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, इंडिया आघाडी वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत, दिल्लीत इंडिया आघाडीची खलबतं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *