Chahagan Bhujbal Full Speech : विधानसभेच्या जागा सांगितल्या, भाजपला ठणकावलं, भुजबळांचं Uncut भाषा!
Chhagan Bhujbal, Mumbai : “आम्ही मागच्या वेळेस म्हटलं की 80 जागा आम्हाला कमीत कमी मिळाल्या पाहिजेत. तर हे ताबोडतोब माझ्याविरोधात बोलू लागले. मी म्हटलं बर बबा नाही बोलत. जागा वाटपाचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालवून तुमचा फायदा होणार नाही. याचा लवकर निपटारा करायला पाहिजे. उमेदवार काय करायचे नंतर ठरवा. भाजप मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, मान्य आहे. पण आम्ही सुद्धा सांगितलं की, आमचे जेवढे आमदार आहेत, तेवढेच शिंदेंचे आहेत. त्यामुळे त्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला मिळायला हव्यात” असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. मुंबईत (Mumbai) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा (Ajit Pawar NCP) वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी छगन भुजबळ बोलत होते.
आता विधानसभेची निवडणूक आहे, म्हणजे संविधानाचा प्रश्न नाही
छगन भुजबळ म्हणाले, आता विधानसभेची निवडणूक आहे, म्हणजे संविधानाचा प्रश्न नाही. संविधान बदलाचे काम होणार नाही. तो लोकसभेचा मुद्दा होता, आता विधानसभेला चालणार नाही. आपले मतदार दलित, ओबीसी, मराठा हे आपले मतदार आपल्याला परत मिळवावे लागतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील. त्यांना विश्वास द्यावा लागेल. युपीमध्येही संविधानाबाबत प्रचार झाला, त्यामुळे महायुतीच्या जागा कमी आल्या. महायुतीला ठेच लागली आहे, हे नाकारुन चालणार नाही. लोकभा निवडणूकीत महायुतीला ठेच लागली हे नाकारुन चालत नाही. दगडधोंडे बाजूला करावे लागतील. मुंबईत प्रत्येक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. विकास विकास आणि विकास मात्र मुंबईत किती निवडून आले आहेत. लाखो कोटी खर्च केले, मात्र आपले उमेदवार निवडून आले नाहीत, असंही भुजबळ यांनी सांगितलं.