मोठी बातमी! गोकुळनं केली दुधाच्या दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, नेमकी किती झाली वाढ?
Gokul Milk Price News : मुंबईसह (Mumbai) पुणेकरांसाठी (Pune) थोडी निराशाजनक बातमी आहे. कारण गोकुळ दूध संघानं (Gokul Dairy) गाईच्या दुधाच्या विक्री दरामध्ये (Cow Milk Price) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुधाची ही दरवाढ फक्त पुणे आणि मुंबई या ठिकाणीच असणार आहे. 1 जुलैपासून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये मोठी मागणी
आहे.
पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात कोणतीही वाढ नाही
गोकुळ दूध संघानं मोठा निर्णय घेतला. गाईच्या दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ फक्त मुंबई आणि पुणे या ठिकाणीच असणार आहे. पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याची माहिती गोकुळकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या दूध दरवाढीचा ताण मुंबई आणि पुणेकरांना पडणार आहे.
दरवाढीमुळे दूध विक्रीवर कोणताही परिणाम झाला नाही
वाढता खर्च आणि दूध पावडरीमधील होणाऱ्या तोट्याचा ताळमेळ घालण्यासाठी सध्या वाढलेल्या दरामुळे उत्पादक आणि संघाला हातभार लागणार आहे. दरम्यान, राज्यातील इतरही सर्वच दूध संघांनी दरवाढ केली आहे. त्यानंतर गोकुळ दूध संघानेही दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीत चर्चा संचालक मंडळाने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होते. त्यानुसार 1 जुलै पासून दुधाच्या दरात वाढ लागू करण्यात आली आहे. दरम्यान, दरवाढीमुळे दूध विक्रीवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत आहे. पूर्वीप्रमाणे दूध विक्री सुरू असून आणखी दुधाला मागणी वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का?
दरम्यान, दूध संस्था आपल्या दुधाच्या दरात वाढ करत आहेत. याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो हे पाहणं देखील महत्वाचं आहे. कारण सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर मिळत आहे. एका बाजुला चाऱ्याच्या, पशुखाद्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे दुधाला अपेक्षीत दर मिळत नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. अशातच दुसरीकडे मात्र, दूध संस्था दुधाच्या दरात वाढ करत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर न देता संस्था त्यांनी विक्री केलेल्या दुधाच्या दरात वाढ करत असल्याचे बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
Gokul : ‘गोकुळ’कडून म्हशीच्या दूध खरेदी दरात दीड रुपयांनी वाढ; गायीच्या दूध खरेदी दरात कपात
अधिक पाहा..