दूध दरासाठी शेतकरी पुत्रांचे 6 दिवसांपासून आमरण उपोषण, दुधाला 40 रुपये हमीभाव देण्याची मागणी
Agitation for Milk Price in Akole Ahmednagar : सध्या राज्यात दूध दराच्या (Milk Price) मुद्यावरुन चांगलच वातावरण गरम झाल्याचं वातावरण दिसत आहे. दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरुन सरकारचा निषेध करत आहे. दरम्यान, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले (Akole) तालुक्यातील गणोरे गावात शुभम आंबरे आणि संदिप दराडे या तरुणांनी दूध दरासाठी आमरण उपोषण (Fasting to death) सुरु केलं आहे. आज या उपोषणाचा सहावा दिवस आहे. दुधाला किमान 40 रुपये हमीभाव मिळावा अशी यांची मागणी आहे. या तरुणांच्या समर्थनासाठी परिसरातील गावे एकवटली आहेत.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा, दहा गावांनी पाळला कडकडीत बंद
दरम्यान, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज गणोरेसह परिसरातील दहा गावांनी कडकडीत बंद पाळला आहे. गणोरे, हिवरगाव, डोंगरगाव, विरगाव, पिंपळगाव, समशेरपूर, देवठाण, वडगाव लांडगा, कळस, गुंजाळवाडी, सावरगाव पाट या गावांनी कडकडीत बंद पाळला आहे.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार निलेश लंकेच्या नेतृत्वात आंदोलन सुरु
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आंदोलन सुरु आहे. खासदार निलेश लंकेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. शेतकरी जन आक्रोश आंदोलनाच्या ठिकाणी दुधाच्या कॅनची हंडी उभारण्यात आली आहे. तसेच त्याला कांद्याच्या माळा देखील लावण्यात आल्या आहेत. आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांचा कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा, या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढ्या, म्हशी आणि गायी घेऊन निलेश लंके आंदोलन करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Nilesh Lanke : गळ्यात कांद्याच्या माळा, डोक्यावर गांधी टोपी, खासदार निलेश लंकेंचं बैलगाडीतून कांदा, दूध दरासाठी आंदोलन
अधिक पाहा..