Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1PM : 5 ऑगस्ट 2024: ABP Majha

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1PM : 5 ऑगस्ट 2024: ABP Majha 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव यात्रेवर आहेत. आपल्या या यात्रेच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहेत. 4 ऑगस्ट रोजी एका सभेत बोलताना त्यांना ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोक आहे. कुणबी मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नये, असे प्रकाश आंबेडकर आंबेडकर म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता आंबेडकर यांनी शिवसेना पक्षावर मोठं विधान केलं आहे.  

शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो

“उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला तर समजेल की एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट सरळसरळ डबल आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की शिवसेनेची मतं एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आहेत. आता शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो आहे. उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा आरक्षणवादी आणि मुस्लीम यांच्यामुळे वाढला आहे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *