मोठी बातमी! धनराज शिंदे विधानसभेच्या आखाड्यात? रमेश शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, माढ्यात शिंदे कुटुंबात राजकीय संघर्ष
Madha Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर माढा विधानसभेतील (Madha Vidhansabha) राजकीय वातावरण चांगलच तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेचे (MLA Babandada Shinde) बंधु रमेश शिंदे (Ramesh Shinde) यांनी मुलगा धनराज शिंदे (Dhanraj Shinde) समवेत शरद पवार यांची भेट घेतली आहे. मुंब॔ईत ही भेट घेतली आहे. भेटीत तब्बल एक तास चर्चा झाली आहे.
आमदार बबनदादा शिंदे यांच्या घरात राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता
दरम्यान, आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांचे पुत्र धनराज शिंदे माढा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीनं आमदार बबनदादा शिंदे यांच्या घरात राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रमेश शिंदे हे आपला मुलगा धनराज शिंदेसाठी विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आमदार बबनराव शिंदेचे पुत्र रणजितसिंह शिंदे विधानसभा निवडणूक लढवणार
आमदार बबनराव शिंदेचे पुत्र रणजितसिंह शिंदे यंदा विधानसभा निवडणुक लढवणार आहेत. त्यांच्याच विरोधात आमदार शिंदेंचे बंधु रमेश शिदे यांचा मुलगा धनराज शिंदे माढा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. धनराज शिंदे हे तुतारीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! अजित पवार गटाचे आमदार पिता-पुत्र शरद पवारांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग
अधिक पाहा..