Jalna Blast : स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये झाला स्फोट

Jalna Blast : स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये झाला स्फोट 

 जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अंगावर वितळलेले लोखंड पडल्याने 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. जालन्यातील औद्योगीक वसाहतीत असणारी गजकेसरी स्टील कंपनीत हा प्रकार घडलाय. लोखंड वितळणाऱ्या भट्टीत विस्फोट झाल्याने वितळलेले लोखंड अंगावर पडल्याने  15 जखमी 3 गंभीर जखमी झाले असून आता हा आकडा 22 वर गेला आहे. तीन ते चार मजूर या अपघातात गंभीर जखमी झाल्याचं प्रथमदर्शनी कळाल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितलं असून मजूरांवर उपचार सुरु आहेत.

लोखंड वितळवण्याच्या भट्टीत विस्फोट

गजकेसरी स्टील कंपनीत लोखंड वितळवण्याच्या भट्टीत पातळ धातू असताना वरून घन धातू टाकल्यानं सर्व धातू बाहेर उडाला. या लोखंड वितळवण्याच्या भट्टीत यामुळे विस्फोट झाला. या भट्टीच्या आजूबाजूला अनेक मजूर काम करत होते. जवळपास  20 मजूर या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ओम रुग्णालयात या मजुरांवर उपचार सुरु आहेत.

तीन ते चार मजूर गंभीर जखमी

या घटनेत तीन ते चार मजूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी सांगितले असून पोलीस घटनास्थळी आणि रुग्णालयात उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे. जे मजूर गंभीर स्थितीतून बाहेर आले त्यांचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुढील तपास सुरु असून मजूरांवर उपचार सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *