Jaydeep Apte: जयदीप आपटे दोन दिवसांत सरेंडर होईल, ताबडतोब त्याच्या जामिनाची व्यवस्था करा, ठाण्यातून आदेश गेल्याचा संजय राऊताचा दावा

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे याने ठरवून पोलिसांसमोर सरेंडर केले आहे. त्याला हवी ती कायदेशीर मदत पुरवण्यासाठी ठाण्यातून सूत्रं हलवली जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी जयदीप आपटेच्या (Jaydeep Apte) अटकेबाबत गंभीर आरोप केले. 

जयदीप आपटेच्या पाठीशी महाशक्ती असल्याने तो इतके दिवस पोलिसांना चुकवू शकला. पण शिवभक्तांचा दबाव आणि रेटा एवढा होता की, आपटेचे बॉसही त्याला वाचवू शकले नाहीत. जयदीप आपटे यांच्यापेक्षा ज्यांनी त्याला अनुभव नसताना काम दिलं, ते बेकायदेशीर होते. हे सूत्रधार अजूनही सरकारमध्येच आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

जयदीप आपटेला अटक होण्यापूर्वी गेल्या आठ दिवसांपासून सिंधुदुर्गातील न्यायालयात त्याच्या जामिनाची तयारी सुरु आहे. यासंदर्भातील सूत्रं ठाण्यातून हलवली जात आहेत. मी याठिकाणी वारंवार ठाण्याचा उल्लेख करत आहे. जयदीप आपटे दोन दिवसांत सरेंडर होतील, त्यांच्या जामिनाची ताबडतोब व्यवस्था करा, असे आदेश देण्यात आल आहेत. जयदीप आपटे याला लागणारी कायदेशीर मदतही ठाण्यातून पुरवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यात हा बाजार मांडला आहे आणि जे षडयंत्र रचण्यात आले आहे,  त्याचे सर्व सूत्रधार ठाण्यातच आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

जयदीप आपटेला कल्याणमधून अटक

शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा पडल्यापासून जयदीप आपटे फरार होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली होती. जयदीप आपटे बुधवारी संध्याकाळी तोंडावर मास्क लावून कल्याणमधील आपल्या घरी आला. त्यावेळी इमारतीच्या गेटवर असलेल्या पोलिसांनी जयदीप आपटेला ताब्यात घेतले. पोलिसांनी पकडल्यानंतर जयदीप आपटे रडून घरी जाऊ देण्यासाठी गयावया करत होता. मात्र,पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन थेट पोलीस ठाण्यात नेले. त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून दुपारपर्यंत मालवणमध्ये आणले जाईल. त्यानंतर आपटेला न्यायालयात हजर केले जाईल. 

[embedded content]

आणखी वाचा

पोलिसांनी सासुरवाडीत ‘फिल्डिंग’ लावली, पण जयदीप आपटे अचानक कल्याणच्या घरी अवतरला, अलगद पोलिसांच्या हाती लागला

पोलिसांनी हाक मारताच जयदीप आपटेचं अवसान गळालं, रडत गयावया करायला लागला, जाणून घ्या A टू Z स्टोरी

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *