Aamshya Padavi joins CM Eknath Shinde : आमश्या पाडवी शिंदेंसोबत, उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

Aamshya Padavi joins CM Eknath Shinde : आमश्या पाडवी शिंदेंसोबत, उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तय्यत तयारी केली आहे. भाजपने नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडून काँग्रेसला ही जागा सुटणार आहे. या जागेसाठी ठाकरे गटाचे आमश्या पाडवी देखील इच्छुक होते. या राजकीय घडामोडीनंतर आमदार आमश्या पाडवी यांनी आज रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमश्या पाडवी यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे..आज रविवारी दुपारी आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून पाडवी यांची ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *