ABP Majha Headlines : 07.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला, शिवाजी पार्कमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. 

चार जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, फक्त मोदीच राहतील, उद्धव ठाकरेंची टीका, मोदींनी उद्धव ठाकरेंना संपवून दाखवावं, ठाकरेंचा घणाघात.

राज ठाकरेंच्या भर मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सात मागण्या, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्यावर का बोलता म्हणत इंडिया आघाडीला टोला.

भटकती आत्माच्या टीकेवरुन शरद पवारांची पुन्हा मोदींवर टीका, हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, पवारांचा हल्लाबोल.

४ जूनला मोदी पुन्हा सत्तेत आले तर ठाकरे, पवार तुरुंगात जाणार, बीकेसीतील सभेतून अरविंद केजरीवाल यांचा घणाघआात, मोदींची रशियाच्या पुतीनशी तुलना

सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य ,पण अजित पवार दोषी नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती

मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा… पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आरोप…

भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक, नाशिकमधील भेटीनंतर गिरीश महाजनांचं वक्तव्य, तर महायुतीत येण्यासाठी अनेक जण रांगेत, भुजबळांचा जयंत पाटलांना टोला 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अमेठी दौऱ्यावर, स्मृती इराणींसाठी रोड शोमध्ये सहभागी होणार 
((अमित शाहांचा आज अमेठीत रोड शो))

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *