ABP Majha Headlines 10AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 15 July 2024 Marathi News
दरड कोसळल्यानं कोकण रेल्वेला फटका… मुंबईहून कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या १५ तासांपासून
दरड कोसळल्याने दिवा-रत्नागिरी पॅसेंजर रद्द, तर मांडवी, जनशताब्दी, तुतारी आणि तेजस अजूनही ट्रॅकवरच, दक्षिणेत जाणाऱ्या गाड्या पुण्यामार्गे
रायगड आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट, दोन्ही जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, तर चिपळूण बाजारपेठेत शिरलेलं वाशिष्ठीचं पाणी ओसरलं
मुंबईतील पावसाने सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या १४ दिवसांत पूर्ण
मुंबईला पाणी देणाऱ्या ७ धरणांमध्ये आता ३५ टक्के पाणीसाठा, काल एका दिवसात ६ टक्क्यांची वाढ..
सांगलीतील वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, चार बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला तर कृष्णा नदीची पाणी पातळीत ८ फुटांची वाढ
पूजा खेडकर यांच्या कुटुंबाची पंकजा मुंडेंसोबत संबंधांची चर्चा, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला कुटुंबीयांची देणगी, तर पंकजांच्या उमेदवारीसाठी खेडकरांकडून मोहटा देवीला चांदीचा मुकुट