ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2024 | रविवार
1. जिथे पिकतं तिथे विकत नसतं, अजित पवारांचे बारामतीतून न लढण्याचे पुन्हा संकेत https://tinyurl.com/49xej6xb एवढी कामं करुन बारामतीकर वेगळा निर्णय घेतात तर मी सोडून आमदार मिळावा, म्हणजे माझ्या कामाचं महत्व कळेल, अजित पवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2d73raxd
2. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 वर्ष कळणार नाही, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल https://tinyurl.com/4yxtbbay शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला काय करायचंय, अशोक चव्हाणांचा संजय राऊतांना टोला https://tinyurl.com/mufky8m9
3. माझ्या सरकारनं 600 निर्णय घेतले, पण लाडकी बहीण योजनेखाली बाकीच्या योजना दबून गेल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली खंत https://tinyurl.com/4n95w7b8
4. बीडमध्ये मोठा उलटफेर, कृषिमंत्री धनंजय मुंडे भल्या पहाटे भेटीला आल्याचा मनोज जरांगेंचा दावा, धनंजय मुंडेंनी मात्र भेटीचा इन्कार https://tinyurl.com/4wa8snfj
5. गणराया, महायुतीच्या नेत्यांना बुद्धी द्या, जेणेकरून ते चुकीचं वक्तव्य करणार नाही, छगन भुजबळांचं बाप्पाला साकडं https://tinyurl.com/ycxhpsy7 मनोज जरांगेंवर आरोप करणं थांबवा, अन्यथा येवल्यामधून यापुढे गुलाल लागू देणार नाही, मराठा आंदोलकांचा छगन भुजबळांना इशारा https://tinyurl.com/3rvas4w2
6. कोल्हापुरात गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट, लेसरमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव, तर ड्युटीवरील पोलिस हवालदाराचा उजवा डोळा लाल होऊन सूजला https://tinyurl.com/56wkn3f4
7. अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचत संपवलं, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील धक्कादायक घटना https://tinyurl.com/mtwkdnx8 चिमुकला लघुशंकेसाठी घराच्या ओट्यावर आला, तेव्हाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील घटना https://tinyurl.com/5r9fpjhe
8. संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडणार, संध्याकाळी वादळी वाऱ्यांची शक्यता, हवामान विभागाचा इशारा https://tinyurl.com/yyjc2u5m कोकणमध्ये आज ऑरेंज अलर्ट तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारामध्ये पावसाचा जोर कायम राहणार https://tinyurl.com/mr2bc3vc
9. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 90 दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्राची मान्यता, सोयाबीनला 4 हजार 892 रुपयांचा हमी भाव मिळणार https://tinyurl.com/bdeavxn6
10. पॅरालिम्पिकमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी, 7 सुवर्णपदकांसह केली 29 पदकांची कमाई https://tinyurl.com/ysdm4hny
एबीपी माझा स्पेशल
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका विकास योजना नेमकी काय? 2 लाख 77 हजार 500 रुपयांचं अनुदान कुणाला मिळतं? https://tinyurl.com/56u2hyt8
अधिक पाहा..